About Us

आपण मोठ्या उत्साहाने एखादा व्यवसाय सुरू करतो, पण तो अपेक्षेप्रमाणे चालत नाही यामध्ये दोष व्यवसायाचा नसून तुमच्या कार्यपद्धतीचा आहे. कारण तुमच्या परिसरामध्ये तोच व्यवसाय दुसरा कोणीतरी यशस्वीपणे चालवतोय आणि तुम्हाला हवे तसे यश मिळत नाही, यातच सर्व आले. प्रत्येक व्यवसायात लाखो करोडो कमवणारे व्यवसायिक आहेत मग तुम्हीच का अपयशी ठरत आहात?

आपण नेहमीप्रमाणे तेच तेच पारंपारिक मार्ग वापरून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. पण जो मार्ग अपयशी ठरतोय ते बदलण्याचे आपण धाडस दाखवत नाही.

आपण आपल्या दैनंदिन आयुष्य मध्ये अनेक सेवांचा लाभ घेत असतो आणि आपल्याला त्यासाठी ती सेवा देणाऱ्यांची ही आवश्यकता असते. हीच गरज ओळखून आम्ही आपल्यासाठी ‘MITRAAZ’ हे ऑनलाइन प्लॅटफॉर्म वेबसाईट व मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहेत.

सध्याचे युग डिजिटल असल्याने डिजिटल असण्याला कधी नव्हे ते अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून व्यवसाय करणे फायद्याचे ठरणार आहे आणि यासाठी ग्राहकही ऑनलाइन मिळवण्याची गरज आहे.या पार्श्वभूमीवर पारंपारिक व्यवसायाच्या चौकटी मोडून आपला व्यवसाय ऑनलाइन आणणे महत्वाचे आहे.

पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यासमोर “स्मार्ट आणि जलद” ई-कॉमर्स उद्योगाने  मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने केलेले उद्योग व व्यवसाय तोट्यात जात असल्याचे बाजारातील चित्र आहे.या संकटातून मार्ग काढण्यासाठी बरेच जणांनी आपला व्यवसाय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणण्याचा ‘स्मार्ट’ निर्णय घेतला आहे. त्यांनी व्यवसायाच्या पारंपारिक पद्धती बरोबरच डिजिटल प्लॅटफॉर्मचा ही स्वीकार केला.

पारंपारिक पद्धतीने व्यवसाय करणारा सहजासहजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर येण्यास धजावत नाही. “आम्ही जसे आहोत तसेच बरे” ही त्यामागची भावना असते. कोरोना या महामारी मुळे निर्माण झालेली परिस्थिती त्यामुळे व्यवसायिकांची झालेली वाताहात, वाढती स्पर्धा, डिजिटल होणारे जग पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन शिवाय पर्याय नसल्याचे दिसून येते. “परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे.” आपण काळाप्रमाणे आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल केला नाही तर लवकरच आपले अस्तित्व संपुष्टात येईल.

सध्याच्या काळात कोणतीही सेवा किंवा वस्तू घेण्याआधी लोक सर्वप्रथम त्याविषयीची माहिती ऑनलाइन माध्यमातून मिळविण्याचा प्रयत्न करतात. ( व्यवसाईकांचे संपर्क क्र, व्यवसायाचे मानांकन, व्यवसायाबाबत चे ग्राहकांचे मत, वस्तु व सेवा उपलब्ध आहेत का?) अशा परिस्थितीत संबंधित व्यवसायाच्या उत्पादनाची वा सेवा संबंधी संपूर्ण माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवर असणे अधिक महत्वाचे ठरते.

प्रत्येक भारतीयाने आपल्या लोकल साठी वोकल बनायच आहे. लोकल ब्रांडला ग्लोबल ब्रँड बनवायचा आहे. लोकल व्यवसायाचा अभिमानाने प्रचार व प्रसार करण्यासाठी त्याला बळकटी देण्यासाठी तुम्हाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी तुमचा व्यवसाय डिजिटल होणे अत्यंत आवश्यक आहे.

There will be direct contact between customers & vendors which will create transparency & independence.

Making  smile in your face is our duty. We care about your every single need & we help you to find best services option across Maharashtra through multiple platforms such as website & mobile app. You should have no problem to getting any service anywhere in Maharashtra.

Our aim is creating an incredibly, user-friendly & convenient experience to customer. Helping small business and vendors to grow and great value addition to the vendors.